Breaking News

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी टिकाकारांना प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा आज मुंबईत एमसीए लॉन्ज येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला.

मुश्ताक अंतुले हे रायगड लोकसभा मतदारसंघात फिरतील परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवारांसोबत फिरत आहेत हे समजले तर राजकारणातील क्षणाला नक्कीच कलाटणी मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या पक्षावर अल्पसंख्याक समाज नाराज असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे हे सुनिल तटकरे यांनी निक्षून सांगितले.

बॅ. ए. आर अंतुले यांच्यामुळे राज्यमंत्री हे पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झाले. देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी ७ कोटी रुपयांची केली होती. शिवाय आमदारांना कायमची निवासस्थाने दिली. आमदारांचा प्रोटोकॉलही आणि आमदारांचे स्थान बळकट करण्याचे काम बॅरिस्टर अंतुले यांनी त्यावेळी केले असे वलयांकित नेतृत्व अंतुले यांच्यारुपाने महाराष्ट्राने पाहिले असा अनुभवही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितला.

माझ्या वडिलांच्यासोबत अंतुलेसाहेबांकडे जायचो त्यावेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले. दिर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे.बॅरिस्टर अंतुले यांनी कॉंग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले. इंदिरा गांधींना सहकार्य केले. त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता. मात्र कॉंग्रेसने त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही माहित नाही. कॉंग्रेसने ठरवले असते तर मुश्ताक अंतुले यांचा उपयोग कॉंग्रेस वाढीसाठी केला असता तर कॉंग्रेस अजून वाढली असती असेही भाष्य सुनिल तटकरे यांनी केले.

महाराष्ट्रात विकास करण्याची जी शक्ती उभी राहिली आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी दिली.

अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये काम केल्यानंतर आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हा क्षण येणार होता. तो आज २२ एप्रिल रोजी आला आहे. मधल्या काळात मी पहात होतो श्रीवर्धनमध्ये सुनिल तटकरे, अदिती तटकरे काम करत होते ते काम पाहिल्यानंतर अंतुलेसाहेबांनी ज्या योजना आखल्या होत्या त्या सगळ्या योजना तटकरे पूर्ण करत होते हे दिसत होते. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर जी धमक कुणात असेल तर ती तटकरेसाहेबांमध्ये लोकांनी पाहिली आहे त्यामुळेच त्यांनी प्रभावित केले असेही मुश्ताक अंतुले म्हणाले.

अनेक विकास कामे होत असतील तर या सरकारला का पाठिंबा देऊ नये असे सांगतानाच पक्षात येऊन आनंद वाटला. यामुळे स्वतः च्या जीवनात फार मोठा बदल होणार आहे. बॅरिस्टर अंतुले यांचे नाव आपण घेतो आहे. मात्र काही लोकांकडून अपप्रचार सुरू आहे त्याला बळी न पडता तटकरेसाहेबांना निवडून द्यायचे आहे. तटकरेसाहेब आपल्या कामाची धमक रायगड जिल्हयाने पाहिली आहे. त्यामुळे तुम्ही निवडून येणार आहात हे नक्की असेही मुश्ताक अंतुले यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार मुश्ताक अंतुले यांच्यासोबत अॅड. विलास नाईक यांनीही जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *