Breaking News

नरेंद्र मोदी यांचा आरोप, साहेबजादे हारतील… परदेशातील शक्तींशी हात मिळवणी

२० एप्रिल रोजी राजकीय पक्षांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी त्यांच्याच पक्षाला मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रचाराची जोरात सुरुवात केली. कर्नाटकातील चिक्कबल्लारपुरा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवित म्हणाले की, भारतातील आणि परदेशातील मोठ्या आणि शक्तिशाली लोकांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी हातमिळवणी केली असल्याचा आरोप केला.

तसेच पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये अमेठीमधून पराभूत झाल्याप्रमाणे केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही “काँग्रेसचे साहेबजादे” हरतील, आणि पुन्हा राहुल गांधी यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल अशी खोचक टीका केली.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “येथे माता-भगिनी मोठ्या संख्येने आल्या आहेत. तुमचा संघर्ष आणि तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तुम्हाला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते, ते मोदींनी त्यांच्या घरात पाहिले आहे. आजकाल देशातील आणि परदेशातील बडे आणि शक्तिशाली लोक मोदींना हटवण्यासाठी एकत्र आले आहेत.

नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, परंतु, नारी शक्ती आणि मातृ शक्तीच्या आशीर्वादामुळे आणि सुरक्षा कवच (सुरक्षा कवच) मुळे, मोदी आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहेत. माता, भगिनी आणि मुलींची सेवा करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे मोदींचे प्राधान्य आहे. त्यांच्या सरकारने महिलांच्या कल्याणासाठी दहा वर्षांत केलेल्या उपाययोजनांची यादी वाचून दाखविली. जसे की त्यांच्या बचत गटांना पाठिंबा देणे आणि ‘लखपती दीदी’ तयार करणे, ही योजना असल्याचेही यावेळी जाहिर केले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही बिहारमधील भागलपूर येथील निवडणूक रॅलीत मोदी सरकारवर निशाणा साधला. “त्यांची संख्या १५० च्या पुढे जाणार नाही” असे प्रतिपादन करून लोकसभा निवडणुकीत ३७० पेक्षा जास्त जागा जिंकतील या भाजपाच्या दाव्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, बसपाने पंजाबमधील फरीदकोट आणि गुरुदासपूर मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले.

१९ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या मतदानाची टक्केवारी ६३.८९% होती. सर्व मतदान केंद्रांचे अहवाल प्राप्त झाल्यावर मतदानाची टक्केवारी वरच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, असे भारतीय निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे. “उष्णतेची लाट असूनही” मतदान मंडळाने “मतदारांनी सर्वाधिक मतदान” केल्याबद्दल प्रशंसा केली.

राज्यातील मागील सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमधील जवळपास ३० लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या मतदानात किमान दोन टक्के घट नोंदवली गेली.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *