Breaking News

फडणवीस म्हणाले, भाजपाचा भगवा छत्रपतींचा भगवा झेंडा सुरक्षित ठेवणार शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

काही लोक केवळ भगवा मिरवतात पण पाठीमागे कोणकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  अप्रत्यक्ष शिवसेनेला टोला लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्या बोलताना शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून आले. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आपल्या सगळंयाचा उत्साह बघता माझ्या मनात कुठलीही शंका नाही, की पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकेल. जाणीवपूर्वक भाजपाचा भगवा म्हणतोय, भगवा तर छत्रपतींचा आहे. परंतु तो छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली आहे. काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण पाठीमागे कोणाकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहिला पाहिजे, या महाराष्ट्रात ही जबाबदारी भाजपाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, खरं म्हणजे नाशिक महापालिकेच्या मागील निवडणुकीत जनतेने एक मोठा आशीर्वाद भाजपाला दिला. त्यावेळी मी सांगितलं होते की, आपण आशीर्वाद द्या नाशिक शहर मी दत्तक घेईन. काही लोकाचा गैरसमज असा झाला की दत्तकचा अर्थ रोज महापालिका चालवायची आणि त्यातून दलाली खायची. कारण पूर्वी अनेक लोक असे करायचे. आमच्याकडे दत्तकचा अर्थ तो नाही. आमच्याकडे दत्तकचा अर्थ एवढाच आहे, महानगर पालिका महापालिकेचे पदाधिकारी चालवतील जिथे अडचण येईल तिथे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू. जेवढ्या देशातील आणि राज्यातील योजना आहेत, त्या सगळ्या योजना नाशिकमध्ये आम्ही आणून दाखवू असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *