Breaking News

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे म्हणाले, …तर चौथ्या लाटेचा धोका नाही मार्च एप्रिलमध्ये निर्बंधमुक्त होण्याची शक्यता

जवळपास महिनाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मार्च नाही तर एप्रिल महिन्यात राज्यात निर्बंधमुक्त होण्याची शक्यता असून राज्यातील कोरोनाच्या चवथ्या लाटेचा सामना करायचा असेल तर सर्वांचेच लसीकरण व्हायला हवे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.

जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी कोरोनाच्या चवथ्या वाटेबाबत आणि सध्या असलेले निर्बंध कधी हटविले जाणार याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.   कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालीय ही समाधानाची बाब असली तरी चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. देशात किंवा राज्यात करोनाची चौथी लाट येऊ शकते का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, आधी रुग्णसंख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की नवीन केसेसची संख्या कमी झालीय. राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली गेलीय. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी ४८ हजार रुग्ण आढळत होते. काही लाखांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचं प्रमाण खूप चांगलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जे काही राहिलेलं लसीकरण आहे त्यांना मनापासून विनंती करायचीय की पूर्ण लसीकरण करुन घ्यावं. बुस्टर डोससाठी जे पात्र आहेत त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिसांनी बुस्टर डोस घेतला पाहिजे. १५ ते १८ वयोगटातील लोकांनाही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिलाय. लसीकरण राहिलेल्यांना मी प्रार्थना करेल की ज्यांची पहिली लस राहिलीय त्यांनी ती नक्की घ्यावी. याचं कारण एकच आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित रहायचा असेल, समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करुन घेणं ही काळाची गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जर आपल्या सर्वांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये फाइट आऊट करण्याची प्रतिबंधात्मक शक्ती असेल तर निश्चित प्रकार चौथ्या लाटेचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अजिबात धोका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *