Breaking News

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल भाजपाचे मोहित कंबोज यांची तक्रार

आपल्या धडाकेबाज शैलीने आणि वक्तव्याने चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्य राज्याच्या अध्यक्षा माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका केल्याने गुन्हा दाखल करण्यात आहे.

विद्या चव्हाण यांनी एका खाजगी वृत वाहिनीवर बोलताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळे विद्या चव्हाण यांच्या विरोधात मोहित कंबोज यांनी गुन्हा दाखल केला. आयपीसी कलम ५०५/२, ३७/१, १३५, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर काहीना काही सतत आरोप करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मोहित कंबोज यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. याबाबतच प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्ला चढवला त्यावर आक्षेप घेत मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलिलात गुन्हा दाखल केला आहे.

आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २००६ ते २०१२ दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही २००६ ते २००९ दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.

याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर ४ सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. रोहित पवारांच्या या संपूर्ण प्रकरणावरती मोहित कंबोज यांनी ट्विट करत टीका केली होती. या संदर्भात रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *