Breaking News

राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, व्याभिचारी तडजोड… आयएएस अधिकारीच म्हणतात तो टेम्पररी मुख्यमंत्री मी परमंट

राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असताना मनसे प्रमुख राज ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्याचा उल्लेख व्याभिचारी तडजोड असा करत जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा जो राग आहे तो तुमच्या मनातून बाहेर काढा. मला जर व्याभिचारी राजकीय तडजोड करायला लागली तर मी घरात बसेन, असे राज ठाकरे यांनी राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर बोट ठेवले.

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मी राजकारणी आहे आणि राजकारण करत असताना असे निर्णय घ्यावे लागतात असे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करून दाखवली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार व्हावा, आमदार व्हावा असं वाटतं. पण तसा खासदार व आमदार होण्यासाठी तशी व्यक्तीही असणे गरजेचे आहे. लोकांना वाटलं पाहिजे की हा आपले प्रश्न सोडवू शकेल. असा माणूस जिंकणे गरजेचे आहे. आपला पक्ष जिंकला पाहिजे. आता मेळाव्यात संख्या किती आहे, असे विचारत ५१५ यांचा व्हाट्सअप चा ग्रुप झाला पाहिजे. होईल की नाही असे सांगत त्यांनी वैभव खडेकर यांचे नाव घेत यांना सगळ्यांना हाकायचे काम करा, म्हणजे ती गुरे नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगितले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, या सगळ्याची जबाबदारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांच्यावर दिली आहे. पक्षाची शाखा नव्हे तर नाका झाला पाहिजे. तुम्ही संध्याकाळी जाताना तोच नाका असे विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. उद्या हाच नाका महिलांना व युवतींना मोठा आधार वाटला पाहिजे हे लक्षात ठेवा असाही महत्वाचा सल्लाही दिला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पुण्यात सध्या काय चाललं आहे असे सांगत एका आयएस अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हणाले की, तो आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरत होता. त्याला विचारल्यावरती त्यांनी सांगितलं की, ‘अरे तो मुख्यमंत्री टेम्पररी आहे, मी परमनंट आहे’ असे सांगताना राज ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नमोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *