Breaking News

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी लवकरच निकाल म्हणून आम्हीही मोठा वकील परवडत नसताना लावल्याचे मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

न्यायमूर्ती लोया मृत्यू संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचं म्हणणं संपलं आहे. ही केस क्लोस टू ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लवकरच येणार असून या खटल्यात विरूध्द बाजूने महागडे वकील लावण्यात आल्याने राज्य सरकारच्यावतीनेही फि परवडत नसताना मोठा वकील लावण्यात आला असल्याचे सांगत न्या.लोया यांच्या मृत्यू संदर्भात छापून आलेले वृत्त चुकीचे असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेत २९३ अन्वये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

न्या. लोया २९/११/२०१४ हे जज स्वप्ना जोशी यांच्या मुलाच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते. साडे सातच्या सुमारास नागपूरला पोहोचले. त्यांची राहण्याची व्यवस्था रवीभवनला करण्यात आली होती. तेथील जेवढ्या रूम बूक केल्या होत्या. त्या सर्व रूम कोर्ट असिस्टंटने बुक केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख असण्याचा प्रश्न नाही रविभवनमध्ये उतरल्यानंतर ते जस्टिस बोरांकडे गले. त्यानंतर न्या. लोया यांनी बाजारात जावून खरेदी केली. लग्न देखील अटेंड केले. त्यांनर रात्री ११ वाजता रवी भवनाला परतले.  रात्री ११ ते ११.३० वाजता पत्नीशी बोलल्याचे फोनच्या कॉल रेकॉर्डवरून माहिती उपलब्ध झाली. साधारणत: पहाटे चार वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागले. मोडकनी बर्डे जजना गाडीं घेऊन बोलावलं. बर्डेंनी राठेंना गाडी घेऊन बोलवले आणि त्यांना दंदे हॉस्पिटलला नेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दंदे अगदी छोटे हॉस्पिटल नाही. तर ते ट्रॉमा केअर हॉस्पिटल आहे. तेथे त्यांचा ईसीजी काढण्यात आला. ईसीजी आधारावर त्यांना तत्काळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाला घेऊन जायला सांगितले. तिथे गेल्यानंतर पल्स लो झाली होती. सीपीआर दिल्यानंतर ते काही वाचले नाहीत. सव्वा सहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतरच उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशासह प्रमुख चार न्यायाधीश त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले. डॉक्टरांनी नीट कारणं नमूद केलेली आहेत. ईसीजीची काय अवस्था हे सर्व नीट नोंद केलेलं आहे. एमएलसी पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यानंतर जज मोडक आणि जज हाजी यांनी मृत्यूची बातमी त्यांच्या घरच्यांना कळविली. तसेच सोबत दोन जज आणि ट्रॅफिकचा माणूस देऊन त्यांच पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्यात आलं. गावात अंतिम संस्कार लातूरला करण्यात आले. त्यानंतर कारावान मॅगझीनने स्टोरी छापेपर्यंत तीन वर्षं झाली तोपर्यंत कोणीही बोललं नव्हतं. जज लोया यांच्या कुटुंबीयांतर्फे मुलाने काही लोक राजकारण करताहेत हे सांगितलं. जे आमच्या परिवाराला मान्य नाही हे सांगितलं. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट त्यामध्ये एम्सचे शर्मा. शर्मांचं पत्र मला चुकीचे मिसकोट कारावन मॅगझिनकडून करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय उचित निर्णय देईल आणि दूध का दूथ पानी का पानी होईल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्याचबरोबर भिमा कोरेगांव येथील हिंसाचारात एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्यार्‍यांना पकडण्यात आलं आहे. सुदैवाने यातील प्रत्येक क्षणाची क्लिप राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. मोबाईलवरील क्लिपमधून सगळे आरोपी आयडेंटिफाय झाले. सगळे गुन्हे दाखल केलेले आहेत. राज्यभरात १७ अ‍ॅट्रोसिटीचे आणि ६२२ इतर गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण ११९९ लोकांना अटक २९५४ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगत या हिंसाचारात १३ कोटी ७ हजार १८५ नुकसान झाले आहे. मिलिंद एकबोटेंना अटक करण्यास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र एकबोटे यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या दोन्ही ठिकाणी त्यांना जामीन मिळू दिला नाही. पोलिसांनी त्यांची कोठडी मागितली. देशाच्या अ‍ॅटर्नी जर्नलना उभे करून कस्टोडियल इन्क्वायरी कशासाठी आवश्यक आहे हे सांगितलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले म्हणून त्यांना अटक केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नितीन आगेचा खून खटल्यातही आरोपींच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेय. या प्रकरणी अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील त्यांना सहाय्यक म्हणून अ‍ॅड. अश्विन थुल यांची नेमणूक केली आहे. फितूर साक्षीदारांवर देखील नगर सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याची पुढची तारीख २१/४/२०१८ ला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *