Breaking News

वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना साडीने घेतला पेट

मागील २० दिवसांमध्ये राज्यातील राजकिय व्यक्तींसोबत दुर्घटना घडत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतही एक दुर्घटना घडत होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधान दाखवित संभावित दुर्घटनेवर मात केल्याने पुढील अनर्थ टळला.

आपल्या पुणे या मतदारसंघातील हिंजवडी येथे कराटे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या छोटेखानी पुतळ्याला पुष्पहार घालताना नकळतच टेबलावरच ठेवलेल्या निरंजनावर सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर पडला. आणि त्याने हलकासा पेट घेतला.

मात्र साडीने पेट घेताच त्यांच्या समोर उभ्या असलेल्या लोकांच्या आणि त्यांच्याही लक्षात साडीने पेट घेतल्याचे दिसून आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रसंगावधान दाखवित स्वतःच्या हाताने साडीला लागलेली आग विझवून टाकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान साडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने वेळीच हे लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

या दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे, असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वांचे मनापासून आभार मानले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *