Breaking News

छगन भुजबळ यांचा सवाल, नर डास जास्त संहारक की मादी डास विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ?

विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्रात मागील आठवड्यात अजित पवार यांच्यासह विरोधकांच्या हत्तीपाय रोगावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यावरून आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची चांगलीच फजिती झाली. त्यामुळे तो प्रश्न राखीव ठेवण्यात आला होता. त्या राखीव ठेवण्यात आलेल्या प्रश्नाला आज आरोग्य मंत्री सावंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळीही सावंत यांनी अजबच उत्तर दिले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न विचारल्याने आरोग्य मंत्री सावंत यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र आज पाह्यला मिळाले. तर सभागृहात एकच हास्य कल्लोळ उडाला.

राखीव ठेवण्यात आलेल्या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना छगन भुजबळ म्हणाले, सरकारने एकूण किती डास पकडले… डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले…यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी उडाली. मात्र सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले.
मात्र या उत्तराने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावर प्रश्न केले. मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना याचे योग्य उत्तर देता आले नाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *