Breaking News

अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, तस असतं तर उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच…. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय लोकशाहीसाठी घातक; विधेयकाला कडाडून विरोध

राज्यातील नगर परिषदांवर नगराध्यक्ष नगरसेवकांमधूनच निवडूण यावा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्या विषयी विधेयकही मंजूर करण्यात आले. आता तुमची बाजू बदलली म्हणून तुम्ही नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची कायदा करताय. असे असेल तर मग मुख्यमंत्री ही थेट जनतेतून निवडा की असा खोचक सल्ला देत विरोदी पक्षनेते अजित पवार म्हणाले तसे जर असते तर उध्दव ठाकरे हे थेट जनतेतून मुख्यमंत्री झाले असते आणि तुमची इच्छा नसती तरी तुम्हाला त्यांच्या सोबत रहावे लागले असते असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

नगराध्यक्ष पदी थेट जनतेतून निवडूण आलेल्या व्यक्तीला नियुक्त करायचे याविषयीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

त्याचबरोबर तुम्ही ज्या आमदारांना सोबत घेवून मु्ख्यमंत्री झालात. तसे मुख्यमंत्री म्हणून कधीच झाला नसतात अशी खोचक टीका करत जसे तुम्ही आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झालात तसेच नगर परिषदेत निवडूण आलेल्या नगरसेवकांच्या मतावरच शहराचा नगराध्यक्ष व्हायला हवा असे मतही त्यांनी मांडले

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडी’च्या निर्णयाला विरोध करताना अजित पवार यांनी सरकारला जोरदार खडेबोल सुनावले.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतका सुध्दा पैसा नाही. त्यामुळे शहरांचा विकास रखडला आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतल्यास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकण्याचे प्रकार वाढीला लागतील. तसेच या प्रक्रियेत मनी आणि मसल पॉवर असणारी विकृती वाढीला लागेल. यापूर्वी सुध्दा अनेक वेळा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचे निर्णय घेण्यात आले होते, काही काळासाठी ते राबविले सुध्दा होते. मात्र अनेक ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा आणि सभागृहात सदस्यांचे बहुमत दुसऱ्या विचाराचे असे प्रकार झाले होते. त्यामुळे शहराच्या विकास कामात आणि निर्णय प्रक्रियेत एकमत होत नाही. त्याचा परिणाम संबंधित शहराच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही विषयीचा भावनिक निर्णय न घेता, तो पूर्णपणे व्यवहारी पातळीवर पडताळून घेणे आवश्यक असल्याचे सांगत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा विधेयकाला त्यांनी विरोध दर्शविला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *