Breaking News

सत्यपाल मलिक यांच्या आरोपावर अमित शाहंनी सोडले मौन म्हणाले, पदावर असताना….. सत्तेत असताना विवेक जागा होत नाही

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असताना याप्रश्नावर भाजपाचे अनेक बड्या नेत्यांनी गप्प राहणे पसंत केले. मात्र मलिकांच्या आरोपांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र ते ही माफक शब्दातच.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी सत्यपाल मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, सत्यपाल मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या सर्व गोष्टी का आठवत आहेत? आणि त्यांना केलेले आरोप खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाहीत? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही, असे ते म्हणाले.

तसेच पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, भाजपा सरकारला देशातील जनतेपासून काही लपवावे लागेल, असं कोणतंही कृत्य आम्ही केलेलं नाही. जर एखादी व्यक्ती राजकीय स्वार्थासाठी आमच्या विचारांशी दूर जाऊन आमच्यावरच आरोप करत असेल तर माध्यम आणि जनतेनेचे याचा विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही दिली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *