Breaking News

पंतप्रधान मोदींना सुसाईड बॉम्बने उडविण्याची धमकी, भाजपा प्रदेशाध्यांच्या कार्यालयात आली चिठ्ठी दौऱ्याचा तपशील लिक झाल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ आणि २५ एप्रिलला केरळ दौऱ्यावर असणार आहेत. या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार सुसाईड बॉम्बने मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मल्याळम भाषेत ही चिठ्ठी लिहिण्यात आली आहे. केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांच्या कार्यालयात ही चिठ्ठी आली.

केरळ भाजपाच्या कार्यालयात एक पत्र पाठवण्यात आलं. हे पत्र मल्याळम भाषेत होतं. यामध्ये अशी धमकी देण्यात आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा केरळ दौरा करतील तेव्हा त्यांना आत्मघातकी बॉम्बने उडवलं जाईल. हा हल्ला थांबवायचा असेल तर थांबवून दाखवा अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ एप्रिलला केरळच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याचा तपशील लिक झाला आहे अशीही माहिती समोर आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी देणारं पत्र हे मागच्या आठवड्यात केरळ भाजपा कार्यालयात आलं होतं. आज सकाळी हे प्रकरण समोर आलं. हे पक्ष केरळ पोलिसांच्या प्रमुखांना सोपवण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी आपल्या नेटवर्क मार्फत या धमकीमागे कोण आहे याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केरळमध्ये येत आहेत. तसंच इतर कार्यक्रमांनाही ते उपस्थित असणार आहेत.

Check Also

सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल

केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *