Breaking News

पुरपस्थितीमुळे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ द्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांची परीक्षा आयुक्तांना सुचना

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस तात्काळ मुदत वाढ द्यावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांना दिल्या.
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे येथील नद्यांना पुर आला. कोकणातील चिपळुण, संगेमश्‍वर, खेड, लांजा, राजापुर या भागातील विद्यार्थ्यांना तसेच पुणे, कोल्हापुर, सातारा येथे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. परंतु कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात पुर सदृश्यपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे रस्ते वाहतुक, रेल्वे वाहतुक बंद आहे. अनेक ठिकाणी रस्तेही खचल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तारीख ७ व ८ ऑगस्ट २०१९ अशी आहे. पंरतु पुरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना संगणकीय विहीत प्रणालीद्वारे किंवा तेथील महाविद्यालयात जाऊन आपले अर्ज भरु शकत नाहीत. यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते अशा सर्व विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांना विनंती करुन अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्राच्या प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत वाढ करण्याची विनंती केली.
त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमाबरोबरच इतर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रवेश प्रक्रीयेतील पुढील टप्प्यातील प्रवेश प्रक्रीयेस विद्यार्थ्यांना तात्काळ मुदत वाढ द्यावी, असे सूचना त्यांनी लेखी पत्राद्वारे राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षाचे आयुक्तांना दिले.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *