Breaking News

यात्रा अर्ध्यावर सोडून पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जयंत पाटील यांनी घेतली धाव रात्रभर पुराच्या पाण्यात फिरुन ग्रामस्थांना दिला दिलासा

सांगली: प्रतिनिधी
सांगली जिल्हयातील अनेक गावांना पुराने वेढा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आहेत. स्थलांतरीत १४ हजार लोकांना जेवणाची सोय करत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे दाखवून दिले.
सांगली जिल्हयाला गेले दोन दिवस पुराने वेढा दिला असून नागरीकांचे मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. जिल्हयात पुरपरिस्थिती असताना पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करुन आमदार जयंत पाटील यांनी लागलीच सांगलीत गाठली. यावेळी पुराने वेढलेल्या लोकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. रात्रीच्या वेळी पुरग्रस्त लोकांमध्ये जात त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली.
वाळवा तालुक्यातील १४ हजार लोकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. या सगळ्या लोकांच्या भेटी घेत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असा धीरही त्यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांना दिला.

Check Also

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *