Breaking News

सहकारी संस्थांना आता वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षही घेता येणार मात्र अट ही ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे

मुंबई : प्रतिनिधी
मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यावर निर्बंध आल्याने या संस्थांना आपले कामकाज चालविणे अवघड झाले होते. मात्र आता यावर राज्य सरकारने तोडगा काढत सहकारी संस्थांना या सभा घेण्यास परवानगी देत मार्गदर्शक तत्वे जाहीर जाहिर केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्व धारण सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन आता ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी असल्याचे आदेश सहकार विभागाने निर्गमित केले आहेत.
तसेच ५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे. संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेल, वॉटसअॅपद्वारे कळविण्यात यावे.
वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवर, संस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच ज्या सभासदांचे ईमेल, पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणा-या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राद्वारे पोहोच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात यावी.
वर्तमानपत्रात जाहिरात देताना त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात यावा
· वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे.
· सभेचा दिनांक व वेळ.
· ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशील नमूद करावा.
सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) द्वारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणा-या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. तसेच एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर वापरणा-या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावा, वार्षिक सर्वसाधारण सभेस सदस्यांच्या उपस्थितीबाबत योग्य नोंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलीत तरतूदीनुसार जतन करावे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

Check Also

शिंदे समर्थक आमदारांच्या त्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रेंडशिप डे… उध्दव ठाकरेंबरोबर मैत्री होणार का? यावर बोलणे टाळले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. …

Leave a Reply

Your email address will not be published.