Breaking News

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः राजकीय नेत्यांचे फोटो तातडीने हटवा

देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक मुख्याधिकारी यांनी राज्य सरकारला आदेश बजावत राज्य सरकारच्या मालकीच्या विविध संकेतस्थळावरील राजकिय नेत्यांचे फोटो तात्काळ आणि विनाविलंब हटविण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांसह सर्व विभागाच्या प्रधान सचिव अन अप्पर मुख्य सचिवांना बजावले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्याधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे शासकिय सेवा निवृत्तीचा कार्यकाळ आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीतच सेवा निवृत्त झाल्यानंतर नवा निवडणूक मुख्याधिकारी शोधायची वेळ येऊ नये यासाठी आयएएस अधिकारी चोकलिंगम यांची राज्याचे नवे निवडणूक मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चोकलिंगम यांनीही पदभार स्विकारल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार शासकिय मालकीच्या विविध संकेतस्थळावर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहे. ते सर्व फोटो तात्काळ हटविण्याचे आदेश नुकतेच सर्व विभागाच्या सचिवांना जारी करण्यात आले आहेत.

यासंदर्भातील निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे आदेश ५ मार्च २०१४ रोजी जारी करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या प्रशासनाकडून एखाद्या प्रस्तावावर निवडणूक (निवडणूक आचारसंहितेच्या काळात किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या काळात) आयोगाची मान्यता आवश्यक असेल तर त्याविषयीचा प्रस्तावावर किंवा तक्रारीवर किंवा समस्येवर आपल्या विभागाच्या स्तरावर निर्णय घेऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात आल्याची कार्यवाही करण्यात आल्याची खासतरजमा संबधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी करावे असे निर्देशही बचाविण्यात आले.

मागील काही वर्षात राज्य सरकारच्या मालकीच्या अर्थात अधिनस्त विभागाच्या संकेतस्थळावर एखाद्या मंत्री-मुख्यमंत्री अथवा राजकिय नेत्याचे फोटो अपलोड करण्यात आलेले असतात. परंतु ते सरकार किंवा तो मंत्री गेला याचा कालावधी संपून दुसरे सरकार किंवा संबधित खात्याचा नवा मंत्री नियुक्त झाला तरी संबधित राजकिय नेत्याचे अपलोड काढून टाकले जात नाहीत. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कृषी विभाग, पदुम विभाग, शिक्षण विभाग, वित्त व नियोजन विभाग, महसूल विभाग, महिला व बाल कल्याण, ग्रामविकास, नगरविकास, उद्योग उर्जा व कामगार विभाग, गृहनिर्माण विभाग आदी विभागासह अनेक विभागांच्या क्षेत्रीय अर्थात जिल्हास्तरीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर राजकीय नेते, मंत्री आदींचे फोटो लावलेले असतात. त्यामुळे हे फोटो तात्काळ आणि विनाविलंब काढून टाकावेत असे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे सांगितले आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यांनी काढलेले हेच ते आदेशः-

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *