Breaking News

खडसे साहेब, शिकार कोण करतंय आणि ताव कोण मारतयं अजित पवारांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण तर मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात आमचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल, गँस यासारख्या वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवून महागाई रोखण्याचा प्रयत्न करत. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. खडसे साहेब तुम्ही इकडे किती तावातावाने आमच्यावर विरोधात भूमिका मांडत होतात. आता तुम्हालाच तिकडे गेल्यावर बाजूला बसवून नको त्या लोकांना पुढे बसवलंय अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत भाजपातंर्गत खडसे विरोधी राजकारणावर भाष्य केले. तसेच खडसे यांना दिलासा देत अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यावर टीका केली.विधानसभेत विरोधकांच्या २९३ अन्वये खालील प्रस्ताव मांडताना त्यावेळी ते बोलत होते.

तुम्ही विरोधात असताना राज्यभर गावोगाव कोण फिरलं, अनं बसलय कोण असा उपरोधिक सवाल करत शिकार कोणी केली आणि ताव कोण मारतंय असे म्हणतं भाजपातंर्गत खडसे यांच्यावर होत असलेल्या पक्षीय अन्यायी राजकारणावर त्यांनी भाष्य केले.

कागदी वाघ कोण?

राज्यात ज्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही सत्तेवर आलात. त्यांनाच कागदी वाघ म्हणत त्यांची जाहीर निंदा नालस्ती करत तुम्हाला काही वाटत नाही का? असा उपरोधिक सवाल अजित पवार यांनी करत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेवर निशाणा साधला.

अजून त्यांना राग येत नाही म्हणून ठिक आहे. मात्र उद्या जर त्यांनी खिशात ठेवलेले कागद जर काढून दिले तर दोन मिनिटात काय होईल सांगता येणार नसल्याचे सांगत शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यावरच राज्य सरकार अद्याप टिकल्याची आठवणही अजित पवार यांनी यावेळी करून दिली. यावेळी अजित पवारांनी महागाई, कायदा व सुव्यवस्था आणि आर्थिक नीती यावर भाष्य करत राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *