Breaking News

आमदारानेच बांधली मशीन पाठीवर, अन् केली निर्जंतुकीकरणाची फवारणी जनतेच्या सुरक्षेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर

अहमदनगर: प्रतिनिधी

जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: पाठीवर मशीन बांधून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात केली.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना बाळगून आमदार निलेश लंके कधी मशीन पाठीवर घेवुन तर कधी ट्रॅक्टरवरुन निर्जंतुकीकरणाची फवारणी करत आहेत. अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतः मैदानात उतरुन काम सुरू केले आहे.

जनतेने स्वतः पैसा जमा करून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्या जनतेला संकटात एकटं सोडणं निलेश लंके यांना शक्य वाटत नाहीय. अनेकजण घराबाहेर पडण्यास तयार नाही. या रोगाच्या भितीने अनेक कर्मचारी फवारणी करण्यासही घाबरत आहेत म्हणूनच आपण स्वतः फवारणीचा निर्णय घेतल्याचं आमदार निलेश लंके सांगतात.

राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असताना सुरक्षेचा प्रश्न म्हणून अनेक आमदार आपल्या मतदारसंघात पाहिजे तेवढे फिरताना दिसत नाही. मात्र लंके यांनी स्वतः रस्त्यावर उतरून फवारणी सुरू केली.

Check Also

नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *