Breaking News

मुळ विषयापासून लक्ष हटविण्यासाठीच राहुल गांधींना आयोगाची नोटीस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

जळगांव जिल्ह्यातील दोन मुलांचा व्हीडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रसिध्द केल्याप्रकरणी राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजाविली. मात्र जो व्हीडीओ आधीच प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयावर व्हायरल झालेला असताना त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे सोडून उलट राहुल गांधी यांना नोटीस बजावणे म्हणजे मुळ विषयापासून लक्ष हटविण्यासाठीच राहुल गांधी यांना नोटीस बजावल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

जळगांव जिल्ह्यातील वाकडी येथील दोन मुलांचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. तसेच हा व्हीडीओ व्हायरल ही झाला होता. परंतु याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी यांना हा व्हीडीओ ट्वीटरवर शेअर केला.

राज्य बाल हक्क आयोगाने जरी नोटीस बजावलेली असली तरी यातील कायदेशीर बाबी तपासून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत. त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे असून त्यांच्यावर कुठली कारवाई केली जात नाही. मग अशा गोष्टींविरोधात आवाज उठवायचा नाही का?  अशा गोष्टींविरोधात आवाज उठवला, त्यात कारवाईची मागणी केली तर त्यात गैर काय आहे ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *