Breaking News

छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट छत्रपती संभाजी नगर येथील रूग्णालयात जाऊन घेतली

मराठा आरक्षणप्रश्नी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा पाणी न घेता आमरण उपोषणाचे पुकारलेले आंदोलन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची माहिती मिळताच  छत्रपती संभाजीराजे यांनी आज पहाटे पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी व काही आवश्यकता असल्यास कळवावे, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ९ दिवसांचे आमरण उपोषण केले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर सध्या गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू आहेत.

जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पहिली दिवशी देखील संभाजीराजे उपोषणस्थळी अंतरवलीला गेले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करावे. परंतु त्यांनी पाणी प्यावी अशी विनंती संभाजी राजेंनी केली व राजेंचा आदर करत जरांगे पाटलांनी एक दिवस पाणी घेतले देखील.

परंतु लढा आणखी तीव्र व्हावा म्हणून त्यांनी पाणी सोडले व त्यांची आरोग्यावर त्याचा परिणाम झाला. सध्या त्यांनी शासनाला वेळ दिला आहे व उपोषण स्थगित केले व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांनी आज पहाटे पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला.

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली. प्रकाश सोळंके यांच्या कथित ओडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत चुकीचा वाक्य प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मनात गैरसमज झाला असावा असे समजून प्रकाश सोळके यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात जाऊन भेट घेतली.

या भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, या विषयाबाबत मला काही माहिती नाही. त्यामुळे माझ्या मनात गैरसमज निर्माण होण्याचा प्रश्नच नाही.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *