Breaking News

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय आयोगाच्या निष्कर्शानुसार रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना अधिकारी किमान सहा महिने पेक्षा अधिक निवृत्तीचा कार्यकाळ असणे आवश्यक असते मात्र नवनिर्वाचित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा निवृत्तीचा कार्यकाळ पाच महिन्यांवर असताना त्यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती कशी काय करण्यात आली आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमा विरोधात ही नियुक्ती करण्यात आली असल्याने तात्काळ त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील केली.

विद्या चव्हाण पुढे बोलताना म्हणाल्या की, रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे महाविकास आघाडीची सरकार असताना त्यावेळी अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केला होता या आरोपामधून अद्यापही त्या निर्दोष सुटलेल्या नाही आहे तरी देखील त्यांची राज्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील नेत्यांविरोधात कार्य केले आहे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळतात, केंद्रातील भाजपा सरकारने रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रति नियुक्ती करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना राज्यात वापस आणण्यात आले आहे, असेही सांगितले.

पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, रश्मी शुक्ला यांची नियुक्ती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला पोलीस प्रशासनाचा उपयोग करण्यात यावा याकरिता हे नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासनाची कामगिरी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळेच रश्मी शुक्ला असतील तर त्यांना जे हवं ते करता येईल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही सरकार चे अस्तित्व नसतं त्यावेळी प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कणखर पोलीस अधिकाऱ्याला नियुक्त केले पाहिजे अशी मागणीही केली.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली होती. एमपीएससी मुलांकडून १२०० रुपये फी घेण्यात येतो आहे. त्याला विरोध केला, बेरोजगार, शेती हे सगळे मुद्दे रोहित पवार यांनी समोर आणले होते म्हणून कारवाई होतेय त्यामुळे त्यांच्या विरोधात ईडीची कारवाई करण्यात येत आहे असा आरोपही केला.

 

 

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *