Breaking News

बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर
एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद यास आणि एका मोबाईल शॉपीच्या मालकालाही ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर एनआयएने या दोघांचीही चौकशी सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे.

तथापि, एनआयएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, १ मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींची ओळख पटली आहे. आरोपींची ओळख एक मुसावीर हुसेन शाजीब आणि सह-कारस्थान अब्दुल मतीन ताहा असे असून, दोघेही शिवमोगा येथील आहेत.

साई प्रसादने एक जुना मोबाईल फोन आरोपी मोबाईल शॉप मालकाला विकला होता, ज्याने नंतर तो चिक्कमंगलुरुच्या मुझमिलला विकला होता, ज्याला अटक करण्यात आली आहे आणि तो NIA च्या ताब्यात आहे. या फोनच्या माध्यमातून मुझमिल हा आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन या दोघांच्या संपर्कात होता.

एनआयएने अटकेदरम्यान मुझमिलचा मोबाईल फोन जप्त केला आणि मोबाईल फोन साई प्रसादचा असल्याचे निष्पन्न झाले. सूत्रांनी सांगितले की, भाजपा कार्यकर्त्याचे नाव दोन मोबाईल शॉपी कामगारांनी ठेवले होते, त्यांची गेल्या आठवड्यात एनआयएने चौकशी केली होती.

साईप्रसाद यांना एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांशी त्याचा संबंध असल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात, एनआयएने शिवमोगा येथे छापे टाकले आणि मोबाईल स्टोअर आणि दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकले.

दरम्यान, साईप्रसाद यांना कर्नाटकातून एनआयएने ताब्यात घेतल्याने काँग्रेसचे दिनेश गुंडूराव एक्स या सोशल मायक्रोब्लॉगिंगवरून निशाणा साधत म्हणाले की, राज्यातील “भगवा समर्थक” आता काय म्हणतील असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *