Breaking News

आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहिरः रेपो रेट जैसे थे

आज शुक्रवारी (५ एप्रिल रोजी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने तिमाही पतधोरण जाहिर केले. मात्र वर्तमानस्थितीत आणि फेब्रुवारी महिन्यात असलेल्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले यांनी रेपो रेट मध्ये ६.५% इतकाच ठेवण्यात आल्याचे सांगत रेपो रेट जैसे थे असल्याचे जाहिर केले.

आरबीआय (RBI) ने २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७% चा GDP वाढीचा अंदाज देखील कायम ठेवला आहे, जून तिमाहीत ७% आणि सप्टेंबर तिमाहीत ६.९% वाढ झाली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत प्रत्येकी ७% वाढ अपेक्षित आहे. हे FY24 साठी अंदाजित ७.६% वाढीपेक्षा कमी आहे. फेब्रुवारीमध्ये, ग्राहक किंमत-आधारित महागाई (CPI) ५.१% होता.

३ एप्रिलपासून सुरू झालेल्या एमपीसीच्या दोन दिवसीय आढावा बैठकीचा आज समारोप झाला. आरबीआय (RBI) ने फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या आपल्या शेवटच्या आढाव्यात पतधोरण दर आणि भूमिकांबाबत यथास्थिती कायम ठेवली होती. भारताच्या केंद्रीय बँकिंग प्राधिकरणाने मागील सलग सहा एमपीसी बैठकींसाठी रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

बेंचमार्क व्याज दर किंवा रेपो दर ६.५% वर जैसे थे

२०२४-२५ साठी जीडीपी वाढ ७% वर कायम राहिली, गेल्या आर्थिक वर्षातील ७.६% पेक्षा कमी

या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई सरासरी ४.५%, FY25 मधील ५.४% पेक्षा कमी

२०२३-२४ या कालावधीत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांद्वारे (FPI) निव्वळ गुंतवणूक $४१.६ अब्ज इतकी होती, २०१४-१५ नंतर FPI प्रवाहाची दुसरी सर्वोच्च पातळी

२०२४-२५ मध्ये चालू खात्यातील तूट व्यवहार्य आणि ठळकपणे आटोपशीर अशा दोन्ही स्तरावर राहील

२०२३-२४ दरम्यान भारतीय रुपया त्याच्या उदयोन्मुख बाजार समवयस्कांच्या तसेच काही प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर श्रेणीबद्ध राहिला.

FY24 मधील प्रमुख चलनांमध्ये INR सर्वात स्थिर

पुढील आर्थिक धोरण समितीची (MPC) बैठक ५ ते ७ जून २०२४ दरम्यान नियोजित आहे.

Check Also

तीन व्यापारी संघटनांनी नव्या कर आकारणीवरून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव ती दुरुस्ती रद्द करण्याची केली मागणी

तीन व्यापारी संघटनांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना देय देण्यासंबंधीच्या नवीन आयकर तरतुदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *