Breaking News

भाजपा म्हणते,… खोटी माहिती देणे थांबवा कांजूर येथील १५ एकर जागा मेट्रो ६ च्या कारशेडला

केवळ स्वतःच्या हट्टापायी मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च लादून प्रकल्पाला विलंब करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, कांजूरमार्ग येथील १५ एकर जागा मेट्रो क्र ६ कारशेड देण्यात येत असलेल्या वृत्तावरुन आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड नेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. पण आजची पत्रकार परिषद ही दिशाभूल करणारी होती.

मुळात महाविकास आघाडी सरकार असताना नेमण्यात आलेल्या शौनिक कमिटीने आरे कारशेड हीच जागा मेट्रो ३ साठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता याचा विसर आदित्य ठाकरेंना पडलेला असावा. ज्या मेट्रो ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे होत असल्याच्या वृत्तावरुन त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ती मेट्रो लोखंडवाला ते कांजूरमार्ग अशी धावणार असून तिचे अंतिम स्थानक कांजूर मार्ग हेच आहे. या संदर्भात यापूर्वीच १५ एकर जागेसाठी केंद्र सरकारच्या विभागाकडे विनंती केली गेली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने तांत्रिक बाबी समजून न घेता अधिक जागा परस्पर एमएमआरडीएला देऊन टाकली.

मुळात मेट्रो ३ ही आठ डब्यांची असून मेट्रो ६ ही सहा डब्यांची मेट्रो आहे. त्याशिवाय मेट्रो.3चे शेवटचे स्थानक सिप्झ आहे. तेथून आरे कारशेडच सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या कारशेडवरती मेट्रो ३ थांबवणे, पुरेशा क्षमतेने वापर करणे हे शक्य नव्हते. आणि त्यामुळेच मेट्रो ३ साठी कांजूरमार्ग हे व्यवहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. आरे येथे ८०० एकर जंगल वाढवण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आणि त्यातही त्यांनी आरे कारशेडची जागा घेतली नव्हती. याबद्दलचे तांत्रिक अडचणी माहीत असूनही आदित्य ठाकरे यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजच्या पत्रकार परिषदेतून केला.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *