Breaking News

सरकारी कर्मचाऱ्यांना या १७ पध्दतीच्या चाचण्या मोफतः वाचा यादी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ५ हजार रूपयापर्यंतच्या चाचण्या मोफत

मागील आठवड्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हिताच्यादृष्टीने वयाची ४० ओलांडलेल्या आणि ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य चाचणी मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. या निर्णयानुसार ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी आरोग्य चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्य विषय़क चाचण्यांचे १७ प्रकार पाडण्यात आले आहेत. त्यातील पहिला प्रकारात रक्तातून विविध गोष्टींची चाचणी करण्याचा आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे टेस्ट कराव्या लागणार आहेत. या चाचण्या सर्व शासकिय वैद्यकीय महाविद्यालये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थामध्ये करता येणार आहे. तर तालुकास्तरावर बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
1) हेमोग्लोबिन, टीएलसी (टोटल Leukocyte count), डिएलसी (Differenitial Leukocyte count), पॉलिमॉर्फ्स, lymphocytes, Eosinophils, monocytes, Basophils, peripheral smear, Thyroid Profile a)T3, b)T4, c)TCH , Vit. B12 test, Vit. D3
2) लघवीशी संबधीत चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
3) त्यानंतर रक्तातील साखर (शुगर ) शी संबधित चाचणी.
4) लिक्विड प्रोफाईल -कोलोस्ट्रोल संबधी चाचणी.
5) लिव्हर फंक्शन चाचणी
6) किडनी फंक्शन चाचणी
7) कॅन्सर स्क्रिनिंग चाचणी
8) एक्स रे चेस्ट पीए व्हिव्यु रिपोर्ट
9) ईसीजी रिपोर्ट
10) युएसजी अब्डोमन विथ पेल्विस चाचणी
11) टीएमटी रिपोर्ट
12) महिलांसाठी मॅमोग्राफी रिपोर्ट
13) ग्यॅनोलिजकल हेल्थ चेक अप
14) पुरूषांसाठी युरोलॉजिकल एक्झामिनेशन
– पुरूषांसाठी रेक्टल एक्झामिनेशन
15) सिस्टेमिक एक्झामिनेशन
16) आय एक्झामिनेशन
17) कानाची तपासणी
या चाचण्या सरकारी कर्मचाऱ्यांना ज्यांचे वय ४० वर्षाहून जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना कराव्या लागणार आहेत. तर ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींना या चाचण्या दरवर्षी करणे बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले चाचण्यासंदर्भातील यादीचे परिपत्रकः

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *