Breaking News

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाने खा नवनीत राणांच्या वडिलांना फरार घोषित करत केला दंड बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाचा निकाल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना बनावट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप झाला. याप्रकऱणी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात पोलिस तपासातही नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले होते. दरम्यान याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होत नवनीत राणा यांच्या वडिलांना फरार घोषित करत दंड ठोठावला.

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सुनावणी झाली. त्यावेळी शिवडी न्यायालयाने यासंदर्भात खासदार नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कुंडलेस यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र नवनीत राणा यांचे वडील कुंडलेस हे सातत्याने गैरहजर रहात असल्याने अखेर मुंबईच्या शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या वडिलांना फरार असल्याचे जाहिर करत एक हजार रूपयांचा दंड ठोठावला.

नवनीत राणांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेले जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, नवनीत राणांच्या वडिलांच्या पुकारा करण्यात आला. पण, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. तसेच, ते न्यायालयात हजरही झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं. आता हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरफार करुन अनुसूचित जाती ( एससी ) चे प्रमाणपत्र अवैधरित्या मिळवला. आणि ते प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आलं. याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात नवनीत राणांसह त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेसही आरोपी आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *