Breaking News

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मोठे वक्तव्य, मरण पत्करू पण भाजपासोबत जाणार नाही एनडीएत गेलो ही एक मोठी चूक

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र भाजपाने महाराष्ट्रात ज्या पध्दतीने शिवसेनेत फूट पाडून भाजपाने शिंदे-फडणवीस सरकार बनविले. त्यामुळे बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षावर महाराष्ट्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची कुणकुण लागताच नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले. या घटनेनंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपावर टीका करत मरण पत्करेन पण भाजपासोबत जाणार नाही असा इशारा दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता फेटाळून लावत आम्ही भाजपासोबत हात मिळवण्याऐवजी मरण पत्करू. २०१७ मध्ये आम्ही एनडीएत गेलो ही आमची मोठी चूक होती अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) आणि भाजपाने २०१७ मध्ये युती केली होती. ही युती पुढे टिकली नाही. यापुढे देखील उभय पक्षांमध्ये युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

जनता दलाच्या (युनायटेड) नेत्यांनी भाजपाला आठवण करून दिली की, दोन पक्षांची युती होती तेव्हा भाजपाला मुस्लीम मतदारांसह जनता दलाचे सर्व समर्थक मतदान करायचे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे जे लोक भाजपासोबत नव्हते त्यांची मतं जनता दलामुळे भाजपाला मिळत होती असा दावाही केला.

कुमार म्हणाले की, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या ‘निराधार’ आरोपांनंतर २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत हातमिळवणी करणं ही आमची चूक होती.

भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे की, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष बिहारमध्ये ४० पैकी ३६ जागा जिंकेल. नितीश कुमार यांनी भाजपाच्या या दाव्याची खिल्ली उडवली.

भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे की, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष बिहारमध्ये ४० पैकी ३६ जागा जिंकेल. नितीश कुमार यांनी भाजपाच्या या दाव्याची खिल्ली उडवली.

नुकतेच इंडिया टूडे सी व्होटर या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात जर लोकसभा निवडणूका झाल्या तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या जागा कमी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांना सध्याच्या जागेपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *