Breaking News

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसची टीम जाहिरः महाराष्ट्रातून या दोघांचा समावेश मल्लिकार्जून खर्गे यांनी शशी थरूर आणि ए के अॅथोनी यांना दिली पुन्हा संधी

साधारणतः नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात लोकसभा निवडणूकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सर्वच राजकिय पक्षांनी गृहित धरली आहे. तर दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ला आपणच पंतप्रधान पदावर पुन्हा निवडूण येणार असल्याचे जाहिर केल्याने देशभरातील सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली. यापार्श्वभूमीवर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर काँग्रेसनेही लोकसभा निवडणूकीसाठी ३९ जणांची आपली तगडी टीम आज जाहिर केली. विशेष म्हणजे या टीममध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश करत पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या शशी थरूर यांचाही या समितीत समावेश केला.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या कार्यकारिणीचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, शशी थरूर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

या कार्यकारिणीत अधीर रंजन चौधरी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपामध्ये गेलेले अनिल अॅथोनी यांचे वडील ए. के. अॅथोनी यांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, काँग्रेस कार्यकारिणीत ए. के. अँटोनी यांचा समावेश करून काँग्रेसने त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काँग्रेसच्या ३९ नेत्यांच्या नव्या कार्यकारिणीत अनेक युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात सचिन पायलट, चरणजीत सिंह चन्नी, कुमारी शैलजा, दीपेंद्र सिंह हुड्डा, गौरव गोगोई, रणदीप सिंह सुरजेवाला अशी काही नावं आहेत. दरम्यान, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक या दोन नेत्यांवर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

या ३९ जणांचा काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीत समावेश

मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी. चिदम्बरम, तारिक अन्वर, पु. लालथनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंह चन्नी, प्रियांका गांधी वाड्रा, कुमारी शैलजा, गईखंगम गंगमई, एन. रघुवीरा रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश ठाकोर, जीए मीर, अविनाश पांडे, दीपा दास मुन्शी, महेंद्रजीत सिंह मालविय, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसैन, कमलेश्वर पटेल, के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *