Breaking News

घरी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मातोश्रीच्या चार जणांसाठी राणेंचा इशारा सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणी चौकशी आणि ईडीचीही चौकशी सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम

आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील सामना चांगलाच रंगण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर शिवसेनेने आता आपला मोर्चा नारायण राणे यांच्याकडे वळविला आहे. जुहू बीच येथील नारायण राणे यांच्या घराबाबत तक्रार आल्यानंतर तपासणीसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या घरी पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासात नारायण राणे यांनी मातोश्रीवरील चार जणांसाठी चांगली बातमी असल्याचे ट्विट करत गर्भित इशारा दिला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने २०२०मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांतसिंहच्या आत्महत्येला आता दीड वर्ष उलटली आहेत. दरम्यान, आता नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. त्यांनी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचादेखील उल्लेख केला आहे.

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले असल्याचे ट्विट करत मातोश्रीला अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष गर्भित इशारा दिला. तसेच आपले अवतरण चिन्हात बॉस कुठे धावणार असा खोचक सवालही केला.

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात नारायण राणे यांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेतलं आहे. तसेच मातोश्रीवरील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. आता हे चार जण कोण आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आधीच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात सुरू असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली होती आणि आजच राणेंनी विनायक राऊतांचं सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी नाव घेतले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी नारायण राणे यांनी दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा एक मंत्री जबाबदार असल्याचा सूचक आरोप करत ऐन लॉकडाऊन काळात सर्वांना बाहेरे फिरायला बंदी असताना तो मंत्री लेटनाईट पार्टीसाठी कसा गेला होता असा सवालही उपस्थित केला होता. तसेच त्या मंत्र्याच्या उपस्थितीचे पुरावेही असल्याचे नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले होते. तसेच कालच मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे यांच्या ट्विटर युध्दात या सुशांतसिंग राजपूर आणि दिशा सालीयनचा मुद्दा उपस्थित झाला होता.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *