Breaking News

फडणवीसांच्या भेटीनंतर खा गिरीश बापट प्रकृती अस्वस्थ असतानाही उतरले प्रचाराच्या मैदानात टिळकांच्या गायकवाड वाड्यात घेतला कार्यकर्ता मेळावा

भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपाने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच अखेरच्या क्षणी भाजपाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीनेही या जागेसाठी उमेदवार दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकृती अस्वस्थामुळे आपण प्रत्यक्ष उतरू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बापट यांची भेट घेताच प्रकृती चांगली नसतानाही रासने यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले.

सध्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा-शिंदे गटाबरोबरच महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपाचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना भाजपा खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले.

यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होतं. मागील अनेक दिवसांपासून बापट एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.

खरं तर, भाजपाकडून हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर याना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे नेतृत्व केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *