Breaking News

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय, “या” वाहनांना टोलमाफी आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून  अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतातप्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात  वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावीअसे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

      आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलीत्याप्रसंगी ते बोलत होतेयावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकरअतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरपोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीअपर जिल्हाधिकारी संजीव जाधवनिवासी उपजिल्हाधिकारी शमा पवारविठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरवनगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी  अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत.

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतातकोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.  या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेत्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागराज्य रस्ते महामंडळ   राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.

वारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी

       आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत.  पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहेत्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर  पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावीकुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावीकाठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवाते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करावारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन सत्रात २४ तास ड्यूटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्यावी, दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावाअसेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

पाऊस  आरोग्य सुविधा

मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करात्यासाठी पंपाचा वापर कराआरोग्य सुविधा औषधेफवारणी तसेच तापाचीसाथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था कराचिखलपाऊसपाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्कसॅनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी.

पिण्याच्या पाण्याची सुविधा

पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करास्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईलत्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावातसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.

यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा

खड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन कराअस्वच्छदुर्गंधी जागा स्वच्छ करा.दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवाहे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करावाहतूक मार्गांचेव्यवस्थेचे चोखपणे नियोजन करासंपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करात्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्यापोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्यारस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.   

वाहतूक व्यवस्था  वीज पुरवठा

          सर्व मानाच्या पालखी मार्गावर  पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये.

वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा

     आषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने ४७०० बसेसची व्यवस्था केली आहेपरंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्‍यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसच्या संख्येत वाढ करावी  भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

समन्वय अधिकारी नेमणूक

 अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले.

चंद्रभागेत स्नान  व्यवस्था

 चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावीयाठिकाणी चांगली स्वच्छतात्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावीमहिला भाविकांसाठी निवारा व्यवस्थेत वाढ करा.

वाढीव निधीची मागणी

 जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोय- सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगरविकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *