Breaking News

राज्यातील पोलिस बदल्यांना मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यत होणार राज्य सरकारकडून नव्याने आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आलेली आहे. मात्र अद्यापही अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी असल्याने या बदल्यांसाठी आता सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आले.

पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यां बदल्यासाठी ५ सप्टेंबर २०२० पर्यतची मुदत देण्यात आली होती. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील जवळपास ४९ प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या काल संध्याकाळपर्यत करण्यात आल्या. परंतु या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरही काही अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे या बदल्यांसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची मुदत राज्य सरकारने दिली.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *