Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, “भारतात या, लस तयार करा” संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांनी मांडली देशाची बाजू

वृत्तसंस्था: प्रतिनिधी

भारतात डिएनएवरील लस तयार करण्यात आली असून १२ वर्षावरील प्रत्येकाला ती देता येणार आहे. तर दुसरी एमआरएनए लस तयार होण्याच्या अंतिम टप्यावर असून कोरोनावरील आणखी एक लस जी नाकाद्वारे दिली जावू शकते त्यावरही भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन करण्याचे काम सुरु आहे. कोरोनावरील लसींचे वाटप पुन्हा गरजू देशांना देण्याचे काम भारताने सुरु केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत जगभरातील कोविड-१९ वरील लस निर्मात्यांनी भारतात येऊन लसींचे उत्पादन करावे असे आवाहन त्यांनी जगभरातील लस निर्माणकर्त्या कंपन्यांना केले.

मागील दिड वर्षापासून संपूर्ण जग १०० वर्षातून आलेल्या महामारीचा सामना करत आहे. त्यासाठी लसींची निर्मिती होणे गरजे आहे. या कालावधीत अनेकजणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या महामारीत प्राण गमावलेल्यांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहीली. भारताने पुन्हा एकदा गरजू देशांना लसींचा पुरवठा सुरु केला असून त्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.

काही देश दहतवादाचा आश्रय घेवून आंतरराष्ट्रीय राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कालांतराने हाच दहशतवाद त्यांच देशाला अडचणीत आणू शकतो असा इशारा त्यांनी पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता दिला.

आर्य चाणक्य यांच्या वाक्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही अनिष्ट गोष्टीला वेळीच ठेचणे गरजेचे असते. अन्यथा काळच त्या गोष्टीला विजयी होण्याची शक्यता संपुष्टात आणते. त्यानुसार आता आंतराराष्ट्रीय समुदायाला दहशतवादा विरोधात कठोर पावले टाकण्याची वेळ आली आहे.

भारताचा लोकशाहीचे मंदिर म्हणून जगभरातील देशांकडून गौरव केला जातो. भारतातील लोकशाहीमुळेच माझ्या सारखा चहा विकण्यास मदत करणारा एक साधा मुलगा भारत देशाचा पंतप्रधान होवू शकला. आणि भारताचा प्रशासकिय प्रमुख या नात्याने सात वर्ष देशाची सेवा करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागौर यांचे एकही बंगाली भाषेत म्हणून दाखवित त्याचा अर्थही सांगितला. भारतात आरोग्य सुविधांमध्ये काम केल्याचे सांगत ३ कोटी लोकांना पक्की घरे त्यांच्या मालकी हक्काने बांधून दिले. त्याचबरोबर कोट्यावधी लोकांना त्यांच्या जमिनीचे मालकीची डिजीटल कागदपत्रे बनून दिली. भारत प्रगती करतो तेव्हा जगाच्या विकासालाही हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *