Breaking News

९ वर्षात ७.५८ लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम ९ वर्षात ३.२५ लाख नवीन ग्राहकांची नोंदणी

मराठी ई-बातम्या टीम
मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला असून त्यात केलेल्या कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील ९ वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या ७.५८ लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे ३.२५ लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमटीएनएल मुंबईने दिली.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमटीएनएल मुंबईकडे मागील १० वर्षात लँडलाईन ग्राहकांची संख्या, सरेंडर संख्या आणि नवीन जोडणीची संख्या याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस एमटीएनएल मुंबईच्या उप महाव्यवस्थापक यांनी वर्ष २०१३-१४ पासून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. मागील ९ वर्षाची आकडेवारी लक्षात घेता सद्यस्थितीत १४,७५,५४७ ग्राहक आहेत. ही संख्या ९ वर्षांपूर्वी १९,४०,३३६ इतकी होती. मागील ९ वर्षात एकूण ७,५८,९२९ ग्राहकांनी सेवेस रामराम ठोकला असला तरी याच कालावधीत ३,२५,३२० इतके नवीन ग्राहक जोडले गेले. वर्ष २०२०-२१ या दरम्यान १,१६,२३३ ग्राहकांनी लँडलाईन सरेंडर केले. मागील २ वर्षांपासून नवीन ग्राहक जोडले गेले असले तरी वर्ष २०२०-२१ या दरम्यान फक्त ३९९८ तर वर्ष २०२१-२२ या दरम्यान २५३५ इतकी नगण्य संख्या आहे. मागील २ वर्षात १,८६,४७७ ग्राहकांने सेवा सरेंडर केली असून फक्त ६५३३ इतकी नवीन जोडणी करण्यात आली आहे.
आधीच सेवेबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि काही वर्षांत कंत्राटी कामामुळे सेवेचा दर्जा राखण्यात एमटीएनएल मुंबई सपशेल अपयशी ठरले आहे. नवीन भरती आणि सेवेची गुणवत्ता राखली तरच एमटीएनएल मुंबईतील स्पर्धेत तग धरु शकेल, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी व्यक्त करत पंतप्रधान, टेलिकॉम मंत्री यांच्याकडे एमटीएनएल मुंबईला वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *