Breaking News

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे निधन ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे आज दुपारी के ई एम इस्पितळात निधन झाले. अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परीवार असून उद्या शनिवारी सकाळी १० वाजता दादर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक दिवंगत हनुमंत उपरे उर्फ उपरे काका यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये “ओबीसी चलो बुद्ध धर्माच्या वाटेवर” अर्थात घर वापसी या माध्यमातून अखंड महाराष्ट्र ढवळून काढला होता. कारण ओबीसी बहुजन समाज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी किती काहीही केलं तरी त्याची प्रगती व विकास होणार नाही . त्याची पूर्ण खात्री झाल्याने ओबीसी हे मुळातील नाग वंशीय असून शाक्य कुलीन शेतकरी आहेत. ते मूळचे भारतीय समाजाचे आहेत. त्यांचे वैभव व परंपरा यांचा फार मोठाआवाका असून आम्ही आज या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही आणि योग्य सन्मान मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या मूळ घरी म्हणजेच घरवापसी करून बुद्ध धम्मा मध्ये गेले पाहिजे अशा प्रकारचा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपरे काका यांनी दिला. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू असताना उपरे काकांचे अकाली निधन झाले.

उपरे काकांच्या पश्चात हे अभियान त्यांचे चिरंजीव संदीप उपरे सांभाळत असून मुंबईचे काम उल्हास राठोड आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय ताकदीने सांभाळत होते. काकांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गावर जाण्याचे २०१६ साली ५००० ओबीसी बहुजन समाज बांधवांनी नागपूर येथे धम्मदीक्षा घेऊन बुध्दाच्या विज्ञानवादी मार्गावर पहिले पाऊल टाकले. हीच उपरे काकाना श्रद्धांजली होती. बाबासाहेबांच्या १९५६ च्या धर्म क्रांती नंतर ओबीसी बहुजन समाजाने टाकलेले हे पहिले पाऊल होते.

त्यानंतर २०१७ वालधुनी कल्याण येथे ओबीसी बहुजन समाजातील सुमारे पाच हजार लोकांनी धर्मदीक्षा घेतली. त्यानंतर २०१८ साली संकल्प भूमी बडोदा गुजरात येथे ५००० लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

काकांनी दाखविलेल्या मार्गाने चालत राहण्याची सर्वात मोठी जबाबदारी मुंबईत उल्हास राठोड यांच्यावर होती. ते आणि त्यांचे सर्व सहकारी जबाबदारी अतिशय ताकदीने पार पडत होते. विज्ञानाकडे, चिकित्सेकडे, विवेकाकडे, तर्काकडे जाऊन अंधश्रद्धांना मूठमाती देऊन ओबीसी बहुजन समाजाचे जीवन सुखी, समृद्ध व विज्ञानवादी कसे होईल याच्यावर सातत्याने उल्हास राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबईची टीम काम करत होते.

अचानक चार दिवसापूर्वी उल्हास राठोड यांची तब्येत ब्रेन हॅमरिंग मुळे बिघडली आणि त्यांना केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची एक पहिली शस्त्रक्रिया झाली ती बरोबर न झाल्यामुळे दुसरी एक शस्त्रक्रिया करण्यात आली‌ त्यानंतर त्यांची तब्येत सुधारत होती. तब्येत सुधारावर असतांनाच आज दुपारी त्यांना मेंदूच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. उद्या शनिवारी सकाळी दादर चैत्यभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *