Breaking News

राज्यातील नवतरूण मतदारांमध्ये १२.८४ टक्क्यांची तर सर्वाधिक वाढ ३०-३९ वयोगटात केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची माहिती

आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुबार नावे डिलीट करण्याची मोहिम सुरु केली. त्याशिवाय सध्या लोकसभा मतदार संघापूरती मर्यादीत असलेली ही मोहिम आता विधानसभा मतदारसंघातही सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक अधिकारी मनोहर पारकर हे ही उपस्थित होते.

मागील वर्षभरात १८ ते १९ या वयोगटातील नवतरूण मतदारांच्या संख्येत ६६ लाख ७ हजार २५० मतदारांची नोंदणी झाली आहे. तर २० ते २९ वयोगटातील १ कोटी ६२ लाख २० हजार ५२४ इतक्या नवमतदारांची नोंद झाली असून ही वाढ १२.८४ टक्के इतकी आहे.

३० ते ३९ वयोगटातील नवमतदारांची संख्या २ कोटी ५० लाख ९ हजार २९४ इतकी नोंदणी झाली असून १६.२३ टक्के अशी सर्वाधिक नोंदणी झालेली आहे. याशिवाय ४० ते ४९ या वयोगटात १ कोटी ९८ लाख ६२ हजार ४१८ इतक्या नव मतदारांची नोंद होत १५.७२ टक्के मतदार वाढले आहेत. ५० ते ५९ वयोगटातल १ कोटी ४८ लाख ५२ हजार ६९० इतक्या मतदारांची नोंद झाली असून ११.७५ टक्के इतकी आहे. ६० ते ६९ या वयोगटातील ९६ लाख ३२ हजार २७८ मतदार नोंदणी झाली असून ७.६२ टक्के इतकी आहे. ७० ते ७९ या वयोगटात ५३ लाख ६९ हजार ८९८ इतकी नोंद झाली असून ४.२५ टक्के आहे. तर ८० वर्षावरील ३१ लाख ७१ हजार ४४९ इतकी नोंद झाली असून २.५१ टक्के इतकी नोंद झाली. ५ जानेवारी २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ९ कोटी २८ लाख ५ हजार ८०१ इतकी नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय राज्यात ५ जानेवारी २०२३ अखेर ४ हजार ७३५ इतके तृतीयपंथ नागरीकांची नोंदणी झाली आहे. तर विधानसभा मतदार संघातील मतदार यादींमध्ये दुबार नावे आणि मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आणि एका मतदारसंघात आणि दुसऱ्या मतदार संघातही सारखीच असणारी २९ लाख नावे आढळून आली असून ही नावे पुन्हा एकदा तपासून काढून टाकण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.

याशिवाय युवा मतदार, दिव्यांग, महिला, देह विक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी व्यक्ती आणि विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *