माहिम विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने महेश सावंत यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले. उच्च न्यायालयाच्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सदा सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत… मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा
राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, परळीत विधानसभा निवडणुकीत २०१ बुथवर हल्ले १२२ बुथ अति संवेदनशील असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले
परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख …
Read More »मारकडवाडीत जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, लोकांची मागणी म्हणून निवडणुका बॅलेटवर घ्या खा. शरद पवार आणि जयंत पाटील यांची मारकडवाडीला भेट; ग्रामस्थांशी केली चर्चा
ईव्हीएम विरोधात लढा पुकारणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. जयंत पाटील यांनी मारकडवाडीच्या जनतेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या भागातून निवडून आलेले आमदार …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …
Read More »दुप्पट फौजफाटा बोलावत मारकडवाडी ग्रामस्थांवर प्रशासनाचा दबावः मतदान स्थगित मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आणि आंदोलन करणार
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे विधानसभा निवडणूकीत मतदाना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला पडलेली मते जास्त होती. त्यामुळे ईव्हीएममधून इतक्या मोठ्या प्रमाणावर ही मते पडलीच कशी असा सवाल करत मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव करत स्वतःच्या पैशातून मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र स्थानिक प्रशासनाने आणि …
Read More »मतदानासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर.
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र …
Read More »भाजपाकडून विनोद तावडे यांचे निवेदन, सीसीटीव्ही तपासा… निवडणूक आयोगाकडून चौकशी होऊन जाऊ द्या
वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार नाशिकमध्ये सर्वाधिक ४५ महिला नियंत्रित मतदान केंद्र
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये …
Read More »९ आणि १० नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदार घरुनच करणार मतदान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा निर्णय
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले आणि दिव्यांग मतदार घरुनच मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी गृहभेटी दरम्यान ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ५८३ व ९३ दिव्यांग मतदारांनी घरातुन मतदानाचा पर्याय निवडला आहे. अशा एकूण ६७६ मतदारांचे मतदान आज ९ नोव्हेंबर …
Read More »