Breaking News

१ मे ला विद्यार्थी संघटना उच्च शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यासमोर करणार अर्धनग्न भीकमागो आंदोलन ३८ दिवस झाले विद्यार्थी संघटना करतेय आंदोलन पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना यांना वेळेच मिळेना

मुंबईतील शासकिय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी कालबाह्य नियुक्तीसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून नियमबाह्य वर्तन आणि १२ विभागीय सहसंचालकांकडील कारभार काढून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनाने दिलेले असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप काढून न घेतल्याने कॉप्स या विद्यार्थी संघटनेकडून मागील ३८ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच संघटनेकडून रितसर मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह उच्च व तंत्र शिक्षण विभागाला देऊनही त्यावर निर्णय घ्यायला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळच मिळेना म्हणून १ मे ला महाराष्ट्र दिनी त्यांच्या शासकिय बंगल्यासमोर भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा कॉप्स संघटनेचे प्रमुख अमर एकाड यांनी दिला.

यासंदर्भात अमर एकड म्हणाले, सुरुवातीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही मागण्यांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शविली. मात्र नंतर कोणत्याच मागण्या मान्य करणार नसल्याचे सांगत भेटीची वेळ देण्यास नकार दिला. मुंबई सारख्या सारख्या शहरात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून नियमांचा खुले आम भंग करण्यात येत असताना त्यावर कोणतीच कारवाई करायची नाही अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतल्याचा आरोपही यावेळी केला.

जर या मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला नाही तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा अमर एकाड यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पाठविलेल्या निवेदनाची पत्र खालीलप्रमाणे….

१) मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

२) मा.ना.श्री. चंद्रकात दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

३) मा. विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य.

४) डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य.

विषय – उच्च शिक्षण विभागातील खालील ८ मागण्यांच्या पूर्ततेसाठी २०-०३-२०२३ पासून आझाद मैदानावर उपोषण करीत असल्याबाबत
महोदय ,
उपरोक्त विषयास अनुसरून उच्च शिक्षण विभागातील खालील ८ मागण्याच्या पूर्ततेसाठी २०-०३-२०२३ पासून आझाद मैदानावर उपोषण करीत आहे.
१) डॉ. अस्मिता वैद्य यांची शासकीय विधी महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथील प्राचार्य पदावर खाजगी महाविद्यालयीन सेवेतील वेतन संरक्षित करून २० महिन्यानंतर केलेली नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करावी. याबाबतचे पत्र व सर्व कागदपत्रे आपणास दिली होती. परंतू अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
२) श्री. सुनिल सोनवणे प्र. प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई यांनी श्रीम. मीना भारती सहयोगी प्राध्यापक ( सेवा निवृत्त) यांना ब्लॅकमेल व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करून तात्काळ कारवाई करावी. याबाबतचे पत्र व सर्व कागदपत्रे आपणास दिली होती. परंतू अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
३) उच्च शिक्षण विभागातील सर्व १२ विभागीय सहसंचालक यांचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ काढावा. याबाबतचे पत्र व सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिले होते अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
४) डॉ. स्वाती व्हावळ प्राचार्य, इस्माईल युसुफ महाविद्यालय यांच्या विषयी १३-०६-२०२२ व १४-०६ -२०२२ रोजी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर उच्च शिक्षण संचालयाने खुलासा व अभिप्रायसह अहवाल शासनास सादर न केल्यामुळे कोणतीच कारवाई झालेली नाही. नऊ महिने उलटूनही कोणतीच कारवाई होत नसून ही अत्यंत गंभीर बाब आहे. सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करावी.
५) सावित्रीबाई फुले मुलीचे वसतीगृह चर्नी रोड मुंबई एप्रिल महिन्यात बंद होणार आहे. येथील ४५० विद्यार्थीनीची राहण्याची पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी.
६) १००० विद्यार्थी क्षमतेचे मुली-मुलांचे दोन स्वतंत्र वसतीगृह तात्काळ सुरू करण्यासाठी मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांनी जिल्हाधिकारी मुंबई शहर व ५०० विद्यार्थी क्षमतेचे मुलीचे वसतीगृह तात्काळ सुरू करण्यासाठी पुणे जिल्याच्या जिल्हाधिकारी सोबत बैठक घेऊन एक एकर जागा उपलब्ध करून घ्यावी. याबाबत डॉ. शैलेंद्र देवळाणकर प्र. शिक्षण संचालक उच्च शिक्षण यांनी जिल्हाधिकारी मुंबई शहर व पुणे कार्यालयास ०८-०२-२०२३ रोजी पत्र दिले होते.
७) शासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील एकूण शिल्लक अनामत रक्कमेच्या ३० टक्के रक्कम ईबीसी विद्यार्थ्यासाठी खर्च करण्याबाबतचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने तात्काळ शासनाला पाठवावा.
८) शासकीय महाविद्यालय/ संस्था मधील प्राचार्य/ संचालक ज्यांचा ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा सर्व प्राचार्य/ संचालक प्रशासकीय बदली तात्काळ करावी. वर नमूद ९ मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० मार्च २०२३ पासून आझाद मैदानावर उपोषण करीत आहे .

आपला विश्वासू
अमर जालिंदर एकाड अध्यक्ष केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन (कॉप्स) महाराष्ट्र राज्य
भ्रमणध्वनी – ९१३७९९२७९९

Check Also

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *