Breaking News

Tag Archives: higher and technical minister

राज्यात १ हजार ४९९ नवी महाविद्यालये सुरु होणारः मुख्यमंत्र्यांची मान्यता नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी …

Read More »

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था …

Read More »

के. सी. महाविद्यालयात ‘जी २० युवा संसद- भारत @२०४७’ कार्यक्रम देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एच. एस. एन. सी. विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या या १२ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता …

Read More »

१ मे ला विद्यार्थी संघटना उच्च शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यासमोर करणार अर्धनग्न भीकमागो आंदोलन ३८ दिवस झाले विद्यार्थी संघटना करतेय आंदोलन पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना यांना वेळेच मिळेना

मुंबईतील शासकिय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी कालबाह्य नियुक्तीसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून नियमबाह्य वर्तन आणि १२ विभागीय सहसंचालकांकडील कारभार काढून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनाने दिलेले असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप काढून न घेतल्याने कॉप्स या विद्यार्थी संघटनेकडून मागील ३८ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच संघटनेकडून रितसर मागण्याचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेशः शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पद भरती करा

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात ६० टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील …

Read More »

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची …

Read More »