Breaking News

न्यायालयाच्या दट्यानंतर नियम बदलला: बिगर लसवंतानाही लोकल प्रवासास मुभा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईसह महानगरातील कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२१ रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश काढत मुंबई महानगरात लोकलने प्रवास करायचा असेल तर नागरीकांनी दोन लसमात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक करत लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले असेल तर त्या नागरीकास लोकलने प्रवास करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर आज राज्य सरकारने मागे घेतला.

फक्त लस घेतलेल्या नागरीकांनाच मुंबई उपनगरीय गाड्यांनी प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यास नुकतेच दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतलेला हा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर होता की नव्हता अशी विचारणा करत आता परिस्थिती आटोक्यात असताना असे निर्बंध मागे घेण्याबाबतही राज्य सरकारची काय भूमिका आहे अशी विचारणा करत यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य सरकारने यासंदर्भात २५ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या समितीच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने फक्त लसीकरण झालेल्यांसाठी असलेल्या नियम रद्दबातल करण्याचे निर्देश देत लोकलने प्रवास करण्यास ज्यांनी लस घेतली नाही अशांनाही लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी निर्देश राज्य सरकारला दिले.

त्यानुसार राज्य सरकारने १० ऑगस्ट, ११ ऑगस्ट रोजी लसवंताना बंधनकारक असलेला निर्णय रद्दबातल ठरविला. लोकल प्रवासास मुभा दिली. मात्र कोविड नियम पाळणे प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मराठी प्रसिध्दी पत्रक आणि इंग्रजी प्रसिध्दी पत्रकात वेगवेगळ्या पध्दतीने भाषेंचा वापर करण्यात आल्याने थोडासा संभ्रम आहे.

राज्य सरकारकडून इंग्रजीत भाषेत प्रसिध्द झालेले पत्रक खालीलप्रमाणे –

राज्य सरकारकडून प्रसारीत करण्यात आलेले मराठीतील प्रसिध्दीपत्रक खालील प्रमाणे-

राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि.३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, .१० ऑगस्ट आणि .११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही  ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, दि.८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि. ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अद्याप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले असले तरी व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

११ ऑगस्टची ब्रेक द चेनची ऑर्डर काय म्हणते-

 

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *