Breaking News

वानखेडेंना न्यायालयाने सांगितले, काय सांगायचंय ते उच्च न्यायालयात सांगा याचिका फेटाळलीः अडचणीत वाढ

मुंबईः प्रतिनिधी
आर्यन खान प्रकरणी प्रभाकर सैल यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समीर वानखेडे यांनी सैल याचे आरोप ग्राह्य धरू नये याकरीता सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी मुबंई पोलिसांच्या कारवाई सामोरे जावे लागू शकते अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
प्रभाकर सैल यांने केलेल्या आरोपामुळे संपूर्ण आर्यन खान प्रकरणाबाबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये असे विनंती पत्र काल रात्री महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजय पांड्ये आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पाठविले होते. त्यानंतर आज वानखेडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेत यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर यासंबधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात असल्याने सत्र न्यायालयाने यावर सुणावनी घेण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. तसेच याप्रश्नी तुम्हाला काय सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा असेही न्यायालयाने वानखेडे यांना सुणावले.
वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. वैयक्तीक बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्र साद करुन तीन मागण्या केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम तपासावर होत असल्याचंही वानखेडे यांनी त्यात म्हटलं आहे. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाकर सैल याने केलेले आरोप
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर सैलने प्रतिज्ञापत्राद्वारे आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे केले. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं सैल यांचा दावा. आपण के पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही सैल यांनी केला.
त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने १० कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर सैलनी सांगितले. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच २ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली.

Check Also

राज्याचा कारभार म्हणजे आंधळ-दळतय अन्… कॅगच्या ठपक्यानंतर गृहनिर्माण विभागाला जाग

मागील काही वर्षात राज्य सरकारकडून नव्या नोकरभरतीवर बंदी कायम असल्याने आणि सरकार व प्रशासनातील अधिकाऱ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *