Breaking News

पोलिस यंत्रणेला चकमा देत मनसे कार्यकर्त्यांचा लोकलने प्रवास ठिकठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरावासियांची जीवन वाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास राज्य सरकारने बंदी आणली असून फक्त सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र मुंबईसह उपनगरातील नागरीकांना दैनदिन कामासाठी एक तर एस.टी अथवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याने सरकारने सर्वांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर विना परवनागी प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले.

काही दिवसांपूर्वी लोकलने प्रवास सर्वांना करण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेने केली होती. परवानगी न दिल्यास विना परवानगी लोकलने प्रवास करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसवेक मनोज धुरी या दोघांनी दादरहून पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास केला. त्यासंदर्भात त्यांनी स्वत:च यासंदर्भातील व्हिडीओ काढून प्रसारीत केला. ठाणे येथेही मनसेने आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु तेथे स्टेशनवर असलेल्या पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखले. तर डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकल प्रवासाला परवानगी मिळावी यासाठी आंदोलन केले. तर काही कार्यकर्त्यांनी रबाळे ते वाशी दरम्यान लोकलने प्रवास केला. तसेच या प्रवासा दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

या विना परवानगी प्रवास केलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांना नंतर समज देवून सोडून दिले.

Check Also

“त्या” नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालास कोण जबाबदार? सिध्दार्थ महाविद्यालय कि मुंबई विद्यापीठ

मुंबईः प्रतिनिधी एलएलबी विभागाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परिक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहिर केला. मात्र एलएलबीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *