Breaking News

पक्षफुटीच्या भीतीने औरंगाबादेत गणेशोत्सोवानंतर मनसेची पुर्नरचना मनसे नेते अभिजीत पानसे यांची माहिती

औरंगाबादः प्रतिनिधी
औरंगाबादेतील बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या हालचाली करंत आहेत. त्यातच जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी पक्ष सोडण्याकरता राजीनामा वरिष्ठांकडे सूपूर्द केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पुर्नरचनेचा विचार सुरू असून गणेशोत्सवानंतर पुर्नरचना करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जेष्ठ नेते अभिजीत पानसे यांनी दिली.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या मनमानीला कंटाळून जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मनसे संघटनेतून बाहेर पडण्यासाठी वरिष्ठांकडे राजीनामे दिले. ते अद्याप मंजूर झाले नाहीत. मात्र येत्या ४-५ दिवसात ते मुंबईत भेटण्यासाठी येणार असल्याची त्यांनी सांगितले.
मनसे जिल्हाध्यक्षाच्या कारभाराला सगळेच वैतागले आहेत. तीन उपाध्यक्ष तीन जिल्हा संघटक आणि दोन सचिव यांच्यासहित जवळपास दीडशे मनसैनिकांची हीच भूमिका आहे. गेल्या १५वर्षांपासून सुमित खांबेकर निवडणूकांच्या काळात शहरातील विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबंत आर्थिक व्यवहार करंतात. त्याचा फटका मनसैनिकांना बसतो. त्यांच्याकडे शहरात अविश्वासाने बघितले जात असल्याची खंत उपाध्यक्ष आशिष सुराडकर यांनी व्यक्त केली.
विद्यमान मनसे जिल्हाध्यांक्षांना पदावरून हटवून मनसैनिकांना मोकळा श्वास घेण्याकरता चांगला जिल्हाध्यक्ष द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत जेष्ठ नेते अभिजित पानसेंच्या मताशी सहमत आहोत. मराठवाड्यात पक्षाची पुर्नरचना होणे अत्यंत गरजेचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *