Breaking News

वरळी ते शिवडी उन्नत मार्ग वर्ष होत आला तरी पूर्ण होईना एमएमआरडीएची माहिती अधिकारात कबुली

मुंबईः प्रतिनिधी
एक वर्षभरापूर्वी अर्थात २०१८ साली मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या बैठकीत 1276 कोटीचा अपेक्षित खर्च मंजूर होऊनही वरळी ते शिवडी उन्नत मार्गाची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. कंत्राटदार, सल्लागार नेमणूकीपासून विविध एनओसीअभावी काम रखडल्याची माहिती दस्तुरखुद्द एमएमआरडीएने माहिती अधिकारात कबुली दिली.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्या माहिती अधिकारात एमएमआरडीए प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाने दिली आहे.
वरळी ते शिवडी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.51 किलोमीटर आणि रुंदी 17 मीटर आहे. या प्रकल्पाच्या अपेक्षित खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 147 व्या दिनांक 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केल्याप्रमाणे रु 1276 कोटी इतका आहे. सद्यस्थितीत कंत्राटदार नियुक्तीची व सल्लागार नेमणुकीची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे गलगली यांनी सांगितले.
वरळी ते शिवडी उन्नत मार्गाकरिता ज्या विभागाची एनओसी आवश्यक आहे. त्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतुक विभाग आणि मुंबई महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण या विभागाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
वरळी ते शिवडी उन्नत मार्ग मुंबई सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अंतर्गत महत्वाचा टप्पा असून एमएमआरडीए प्राधिकरणाने या मार्गासाठी युध्दस्तरावर कार्यवाही करण्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *