Breaking News

‘मस्का’ लावत अभिनेता बनला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी

प्रियदर्शन जाधवची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘सायकल’ हा विविध पुरस्कार सोहळ्यांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत गाजलेला सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे. अशातच ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला आहे. आजवर कधी छोट्या पडद्यावरील तर कधी मोठ्या पडद्यावरील विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना हसवणारा प्रियदर्शन या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळला आहे. दिग्दर्शकाच्या रूपातील ‘मस्का’ या आपल्या पहिल्या सिनेमाला प्रियदर्शनने सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका दिला आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित ‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉम शैलीतील आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’च्या टीझर मध्ये भन्नाट अशा गर्ल नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. या टीझरमध्ये अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकर यांच्यातील संवादावरून या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार असे दिसते. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार टीझरमध्ये आहेत. ‘मस्का’मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.

‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शननेच केले आहे. यापूर्वी लेखक, अभिनेता आणि नाट्यदिग्दर्शक अशी प्रियदर्शनची ओळख होती. आता तो सिनेदिग्दर्शकही बनला आहे. प्रियदर्शनची विनोदी शैली आणि टीझरमधील असलेला सस्पेन्स प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारा आहे. मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’चे निर्माते प्रशांत पुरुषोत्तम पाटील आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सह-प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *