Breaking News

अर्थविषयक

रिझर्व्ह बँकेने ( RBI ) स्टेट बँकेसह तीन बँकांना ३.९२ कोटी रुपयांचा ठोठावला दंड RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.

मुंबई/नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांना 3.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात …

Read More »

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीची मुदत वाढवली ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतीचा कालावधी वाढविला

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीमधील गुंतवणुकीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळेल. आयडीबीआय बँक ४४४ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेत ७.१५ टक्के व्याज दर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के दराने व्याज मिळत आहे. या एफडीतून मुदतीपूर्वी गुंतवणूककाढण्याची आणि बंद करण्याची परवानगी आहे. आयडीबीआय …

Read More »

बॉण्ड म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदारांची मोठी विक्री ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटी रुपये काढले

गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये बाँड म्युच्युअल फंड (डेट म्युच्युअल फंड) योजनांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी २५,८७२ कोटी रुपये काढले आहेत. गुंतवणूकदारांची सावध वृत्ती आणि अमेरिकेतील सध्याचे व्याजदर डेट म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये १६ …

Read More »

पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ५ लाख जमा केल्यानंतर मिळणार इतकी रक्कम

एक सुपरहिट सरकारी योजना आहे. यामध्ये पैसे एकत्र गुंतवून तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल. पोस्ट ऑफिस मासिक योजना असे या सरकारी योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक हमी उत्पन्न योजना आहे. एकल खातेदार यामध्ये जास्तीत जास्त ९ …

Read More »

आकासा एअर बंद होण्याचा धोका, जाणून घ्या काय आहे प्रकरण जाणून घ्या काय प्रकरण ४३ वैमानिकांनी दिले राजीनामे

देशात विमान वाहतूक क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. नुकतीच सुरू झालेली आकासा एअर ही विमानसेवाही बंद होण्याचा धोका आहे. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या या कंपनीच्या ४३ पायलटांनी अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीला दररोज २४ उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, वैमानिकांच्या …

Read More »

EPFO ने जुलैमध्ये विक्रमी सदस्य जोडले, १८.७५ लाख नवीन सदस्य ५२ ट्रांसजेंडर कर्मचाऱ्यांचीही नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, ईपीएफमध्ये जुलैमध्ये सर्वाधिक १८.७५ लाख सदस्य जोडले गेले आहेत. एप्रिल २०१८ मध्ये ईपीएफओ (EPFO) पेरोल डेटाचे प्रकाशन सुरू झाल्यापासून सर्वाधिक सदस्य जोडण्याचा हा विक्रम आहे. ही आकडेवारी सप्टेंबर २०१७ पासून प्रकाशित केला जात आहे. हा ट्रेंड सलग तीन महिने सुरू आहे. जून २०२३ …

Read More »

या बँकांकडून ३ वर्षांच्या एफडीवर ८.६ टक्के व्याज, यादी तपासा लघु वित्त आणि खाजगी क्षेत्रातील बँका एफडीवर ८.६ टक्के व्याज देतात

जे गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छित नाहीत ते बहुतेकदा मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करतात. देशातील अनेक लघु वित्त आणि खाजगी क्षेत्रातील बँका एफडीवर ८.६ टक्के व्याज देत आहेत. देशातील मोठ्या सरकारी बँकांच्या तुलनेत हे व्याज जास्त आहे. BankBazaar.com च्या डेटानुसार, तीन वर्षांच्या एफडीवरवर टॉप १० बँकांचा सरासरी व्याज दर ७.६ टक्के आहे. …

Read More »

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स ७९६ अंकांनी घसरला निफ्टी १९९५० अंकांच्या खाली बंद

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स तब्बल ७९६ अंकांच्या घसरणीसह ६६,८०० वर बंद झाला. निफ्टी २३१.९० अंकांनी कोसळून १९,९०१ च्या पातळीवर बंद झाला. आज बीएसईचे बाजार भांडवल ३,२०,६५,१२२.४३ कोटी रुपये राहिले. त्यात मागील ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत सुमारे …

Read More »

या बँकांकडून एफडीवर सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमपेक्षा जास्त व्याज, पहा संपूर्ण यादी ८.२ टक्के वाज दर फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या रकमेवर

ज्येष्ठ नागरिकांकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही ते लहान बचत योजना आणि बँक एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्येष्ठ नागरिक योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आहे. यामध्ये जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान ८.२ टक्के व्याजदर दिला जात आहे. सरकार दर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर …

Read More »

ही कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा मोठे नुकसान होईल बँक आणि कागदपत्रांशी संबधित कामे पूर्ण करा

आता सप्टेंबर महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलतील. यामुळेच सामान्य लोकांना त्यांचे पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक बचतीशी संबंधित अनेक कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागतात. जेणेकरून नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नुकसान होणार नाही. तुम्हाला तुमच्या २,००० रुपयांच्या नोटा ३० …

Read More »