Breaking News

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र देशातील सर्व निवृतधारकांना जास्तीचे निवृत्तीवेतन मिळावे यासाठी अर्ज सादर करण्यासाठी आणि त्याचे ऑनलाईन दाखल करण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंदर सिंग यांनी दिली.

यापूर्वी निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या वाढीव निवृत्तीवेतन मिळावे यासाठी ४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. आता त्या मुदतीत आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देत ३१ मे २०२४ पूर्वी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहनही केले.

इफो ही निवृत्तीवेतन देणाऱ्या सरकारी संस्थेने आतापर्यंत सादर झालेल्या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव निवृत्तीवेतन देण्याच्या रकमेची मोजणी सुरु केली आहे. तसेच आतापर्यंत इफो कार्यालयाने ३.५० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अर्जावर प्रक्रियाही सुरु केल्याची माहितीही दिली.

Check Also

इंडिगो, जगातील तिसऱ्या क्रमांकांची विमान कंपनी बनली भारतातील सर्वात मोठी एअरलाइन

इंडिगो विमान कंपनीने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत यूएस-आधारित साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *