Breaking News

सरत्या वर्षात सेन्सेक्सने दिला २४ टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटींची वाढ

मराठी ई-बातम्या टीम
या वर्षी कोरोनाच्या सावलीत भारतीय शेअर बाजाराने लक्षणीय वाढ केली आहे. जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत भारतातील बाजारपेठ सातत्याने वाढली. जानेवारीपासून सेन्सेक्स २४ टक्के वाढला. तर याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मात्र, रिटर्न देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्या मागे पडल्या आहेत.
जानेवारीमध्ये सेन्सेक्स ४६,२८५ वर होता, तर ऑक्टोबरमध्ये तो ५९,३०६ वर बंद झाला. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्सने ६२,२४५ ही ऐतिहासिक पातळी गाठली. या काळात त्याचे मार्केट कॅप २७४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. जानेवारीमध्ये मार्केट कॅप १८६ लाख कोटी रुपये होते. ते आता २६४ लाख कोटी रुपये झाले आहे. सेन्सेक्स सध्या ५८ हजारांच्या पुढे व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सचा २४ टक्के परतावा
सेन्सेक्सने २४ टक्के परतावा दिला. परंतु रिलायन्स, टाटा कन्सल्टन्सी (TCS), HDFC बँक सारख्या मोठ्या कंपन्यांनी फारसा चांगला नफा दिला नाही. सर्वाधिक नफा कमावणाऱ्या टॉप १० कंपन्यांमध्ये ट्रायडंट आघाडीवर होती. या शेअर्सचा भाव वर्षापूर्वी ७.८४ रुपये होता जो आता ५३.४० रुपये झाला आहे. म्हणजेच एका वर्षात ५.१६ पट परतावा दिला आहे. पूनावाला फिनकॉर्प दुसऱ्या क्रमांकावर होते. या शेअर्सने ४.१७ पट परतावा दिला आहे. त्याचा भाव वर्षापूर्वी ३५.६५ रुपये होता जो आता २०१ रुपये आहे.
परताव्याच्या बाबतीत KPIT तिसऱ्या क्रमांकावर
परतावा देण्याच्या बाबतीत केपीआयटी तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीचा शेअर्स १०५ रुपयांवरून ५१२ रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच ३.७९ पट नफा दिला आहे. गुजरात फ्लोरोकेमिकलनेही गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे. या कंपनीचा शेअर्स ५२५ रुपयांवरून २,२९३ रुपयांपर्यंत वाढला आहे. याने ३.१४ पट नफा दिला आहे.
अदानी एंटरप्राइझनेही लाभ दिला
अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स ४१७ रुपयांवरून १,६७० रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअर्सने २.८८ पट नफा दिला आहे. म्हणजेच एक लाखाची गुंतवणूक ३.८८ लाख रुपये झाली आहे. दिवाळखोर कंपन्यांचे मालक अनिल अंबानी यांची कंपनीही या यादीत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर्स एका वर्षात ३ रुपयांवरून १३ रुपयांपर्यंत वाढला आहे.
टाटा अलेक्सीने अडीच पट नफा दिला
टाटा समूहाच्या Tata Elxi च्या शेअर्सने २.५२ पट परतावा दिला आहे. त्याच्या शेअर्सची किंमत १,५०५ रुपयांवरून ५,४७२ रुपयांवर गेली आहे. Persistent Systems च्या शेअरची किंमत एक वर्षापूर्वी १,२४८ रुपये होती. सध्या या शेअर्सचा भाव ४,५७२ आहे.
बोरोसिल रिन्युएबलचा २.८२ पट नफा
बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सने एका वर्षात २.८२ पट वाढ दिली. कंपनीचा शेअर्स १७२ वरून ६५१ रुपयांवर गेला. त्याचप्रमाणे इंडियन एनर्जी एक्सचेंजचा शेअर्स ६७ रुपयांवरून २५५ रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच २.७३ पट परतावा दिला आहे. रासायनिक कंपनी बालाजी अमाईन्सचा शेअर्स ३,२१५ रुपयांवर आहे. वर्षभरापूर्वी तो ८५० रुपये होता. केपीआर मिल्सच्या शेअर्सने २.६७ पट परतावा दिला आहे. हा शेअर्स १६२ रुपयांवरून ६०६ रुपयांपर्यंत वाढला आहे.
स्वस्त शेअर्सचा उच्च परतावा
पेनी स्टॉक्स म्हणजेच ते शेअर्स जे खूप स्वस्त आहेत आणि अचानक वाढत आणि घसरत राहतात, त्यांनी भरपूर नफा दिला आहे. Equipe Social ने एका वर्षात २९,१७५ टक्के नफा दिला आहे. ३५ पैशांचा हा शेअर्स आता ११७ रुपयांवर आहे. याच कालावधीत सिम्प्लेक्स पेपर्सचे शेअर्स ८८ पैशांवरून १०२ रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्याचा परतावा १२,१२० टक्के आहे.
फ्लोमिक ग्लोबलकडून १०,३८५ टक्के नफा
Flomik Global च्या शेअर्सची किंमत एका वर्षापूर्वी १.८० रुपये होती, जी आता १०,३८५ टक्के वाढून १८५ रुपये झाली आहे. सूरज इंडस्ट्रीजचा शेअर्स १५४ रुपयांवर आहे. वर्षभरापूर्वी तो १.९५ रुपये होता. डिग्झमचा शेअर्स ३.४५ रुपयांवरून १८४ रुपयांपर्यंत वाढला आहे, तर ब्राइटकॉम समूहाचा शेअर्स ४.२० रुपयांवरून १९५ रुपयांपर्यंत वाढला आहे. या दोघांनी गुंतवणूकदारांना चार हजार टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे. रघुवीर सिंथेटिक्सचा शेअर्स ९३१ रुपयांवर आहे. या शेअर्सने ४ हजारटक्के नफा दिला आहे. वर्षभरापूर्वी हा शेअर्स १७ रुपयांवर होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *