Breaking News

मोठी बातमीः मिरजमधील ८२ डॉक्टरांना कोरोनाची लागण मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री कडून तातडीने दखल

मराठी ई-बातम्या टीम
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत.
राज्यातील एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली.
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच लागण झाली तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार असा प्रश्न उपस्थित करून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी करोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत विचारणा केली आहे. वैद्यकीय सेवा देताना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.
याबाबतचा अहवाल प्राप्त होताच यास जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाईचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *