Breaking News

मागील आठवड्यात या कंपन्यांची बाजार भांडवलात आघाडी शेअर बाजारात टाटा, रिलायन्स बाजार भांडवलात सर्वात पुढे

मराठी ई-बातम्या टीम

शेअर बाजारात मागील आठवड्यात देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १,०१,१४५.०९ कोटी रुपयांनी वाढले. या तेजीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आघाडीवर होते.
मागील आठवड्यात देशातील शेअर बाजारात मोठा चढ-उतार पहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि विप्रो या कंपन्यांच्या बाजार भांडवलात चांगली वाढ झाली.  तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल घसरले.
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ११२.५७ अंकांनी वधारला. या कालावधीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल ३०,७२०.६२ कोटी रुपयांनी वाढून १३,५७,६४४.३३ कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात २१,०३५.९५ कोटी रुपयांची वाढ होऊन ते १६,०४,१५४.५६ कोटी रुपये झाले.
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल १८,६१९.९५ कोटी रुपयांनी घसरून ७,९७,६०९.९४ कोटी रुपयांवर आले आहे. एचडीएफसीचे बाजार भांडवल १५,०८३.९७ कोटी रुपयांनी घसरून ४,५८,८३८.८९ कोटी रुपये झाले. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल ९,७२७.८२ कोटी रुपयांनी घसरून ४,०७,७२०.८८ कोटी रुपये झाले.
इन्फोसिसचे बाजार भांडवल १७,६५६.९५ कोटींनी वाढून  ७,८३,७७९.९९ कोटी रुपये झाले. विप्रोचे बाजार भांडवल १५,७३०.८६ कोटी रुपयांनी वाढून ३,८२,८५७.२५ कोटी रुपये झाले.तर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवल १६,०००.७१ कोटींनी वाढून ५,४०,०५३0.५५ कोटी रुपये झाले.
देशातील टॉप १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विप्रो यांचा क्रमांक आहे.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *